पती, पत्नी और वो..

Image result for extramarital affair
         दिनांक २७ सप्टेंबर २०१८ ला व्यभिचार हा गुन्हा ठरविणारा भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.खरं तर कायद्यात बदल होणे किंवा रद्द करणे हे तसं पाहता सामान्य असतं. कारण नवी पिढी नवी विचारसरणी घेऊन येते.
काय होता कलम ४९७..
           व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा या कायद्यानुसार पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्या व्यक्तिविरुद्ध पती गुन्हा दाखल करू शकत होता.पण जर पतीचे विवाहबाह्य संबंध असेल तर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची समानता पत्नीला नव्हती. अजून यात भर म्हणा किंवा पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन.जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असेल तर पतीच्या गैरहजेरीत त्याचे नातेवाईक फौजदारी कलम १९८(२) अन्वये पत्नीविरुद्ध तक्रार करू शकत होते. म्हणून हे कलमही न्यायालयाने रद्द केले आहे.
Image result for extramarital affair
का? कधी? का बरं ? आला हा कायदा..
           विवाह संस्थेचे अस्तित्व आणि पावित्र्य राखण्यासाठी हा कायदा लॉर्ड मेकॉलच्या काळात म्हणजे १५८ वर्षांपूर्वी बनवलेला कायदा. आणि खरं तर ज्या ब्रिटिश राजवटीत १८६० मध्ये हा कायदा भारतात लागू केला त्यांच्या इंग्लडमध्ये ऑलिव्हर क्रोमवेलच्या सत्तेचा शंभरएक वर्षाचा काळ सोडला तर दंड संहितेत हा गुन्हा नव्हता आणि आजही नाही.
           विवाहसंस्था आणि तिचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी दंड संहितेत व्यभिचार हा गुन्हा कायम ठेवणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारने केला होता.यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा कायदा फक्त विवाहीत स्त्रीकडूनचं पावित्र्याची अपेक्षा करणाऱ्या जुनाट आणि बुरसट अशा पुरुषप्रधान विचारसारणीतून केला गेला आहे.
           यापूर्वी १९५४, १९८५ आणि १९८८ सालच्या निकालांमध्ये कलम ४९७ वैध असल्याचा निकाल देत.यामुळे कुटुंब आणि विवाहसंस्था उध्वस्त होत असल्याचा युक्तिवाद केला होता.
पती, पत्नी और वो..
Image result for pati patni aur woh movie
           १९७८ साली आलेला सिनेमा आणि त्यात संजीव कुमार यांनी साकारलेला धोकेबाज नवरा त्याच्या Secretary सोबत विवाहबाह्य संबंध ठेवतो. त्या वेळी हा सिनेमा बनवला त्याबद्दल बलदेव चोप्रा हे कौतुकास पात्र आहे. पण आता काळ बदलला आहे. लिव्ह-इन पासून वन नाईट स्टँड सारख्या पाश्चिमात्य संकल्पना मोठ्या शहरात डोके वर काढत आहे. त्यामुळे नको ती बंधने अन् नको तो सामाजिक जाच असा विचार करून कोणी खुलेआम एकत्र राहू लागलं. तर ते समाजाला स्वीकारावचं लागेल. कारण कसं असतं, जिथे नैतिकताच नाही तिथे अनैतिकतेचा प्रश्न येऊच शकत नाही. शरीर उपभोगण्याचा हा साधा आणि सोपा मार्ग कोणी निवडणार नाही कशावरून? मग व्यभिचाराचा अर्थ कोण आणि कशासाठी पटवून देणार. तणावपूर्ण जीवनशैलीत सुखाचा शिडकाव शोधणे. याला कोणी पाश्चात्य धोरण म्हणू देतं किंवा लंपटपणा. पण आजच्या धावपळीच्या युगात तो एक सुख समाधान प्राप्त करण्याचा मार्ग बनू शकतो.पण स्वातंत्र्य मिळाले म्हणून गैरवापर होणार नाही हे पाहणं आणि स्वतःचे घर जाळून लोकांना हात शेकण्याचे निमंत्रण देऊ नये. स्वतःची सद्सदवेकबुद्धी बुध्दी शाबूत ठेऊन विचार करून कृती घडावी इतकीच अपेक्षा.
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?