आठवणी टाळता येतात...
आज जुनी डायरी सापडली. तसं ती कधी हरवली नव्हती फक्त तिला नजरेआड केलं होतं.अगदी तुझ्यासारखं.पण आज डायरीसुद्धा तशीच समोर आली जशी तू आली होतीस अचानक. नकळतपणे माझा चेहरा काही झालेच नाही असा फुलला. पण दुसऱ्याच क्षणी तुझ्या डोळ्यातील ते अनोळखी भाव कुठेतरी बोचू लागले होते.पण आज ही डायरी खूप प्रसन्न होती.कारण या डायरीने फक्त आपला सहवास, आनंद, सुख, आपलेपण आणि प्रेम इतकंच अनुभवलं होतं. म्हणजे मीच तिला ते आभासी जग सत्य आहे असं भासवल होतं. त्यामुळे तिची ती प्रसन्नता पाहून मला अपराधी असल्यासारखं वाटू लागलं.ती तर आनंदली होती मला पाहून तिला वाटले होते. कदाचित आज २८४ दिवसानंतर मी काहीतरी लिहिलं. आणि डायरीला सांगेल की सगळं कसं ठीक आहे.
ही डायरीच तर आमच्या प्रेमाची साक्षीदार आहे.आमचा प्रत्येक क्षण तिने अनुभवला आहे.आमच्यासोबत ती कधी हसली आहे.तर कधी शहारली आहे.म्हणजे,
ही डायरीच तर आमच्या प्रेमाची साक्षीदार आहे.आमचा प्रत्येक क्षण तिने अनुभवला आहे.आमच्यासोबत ती कधी हसली आहे.तर कधी शहारली आहे.म्हणजे,

आमचं पहिलंवहिलं चुंबन खूप खास होतं. कारण मी इतका उत्साहीत झालो होतो की मी चक्क डोळे उघडे ठेवण्याचा बलिशपणा केला.आणि दुसऱ्याच क्षणाला श्वास अडकेल या भीतीने तिला दूर लोटून मूर्खपणा.त्यावेळी ही डायरी खूप हसली होती माझ्यावर अगदी तुझ्यासारखी.
तुझ्यातील 'तू' आणि माझ्यातील 'मी' विसरून आपल्यातील आपलं शोधण्यासाठी ४ बाय ६ च्या पलंगावर केलेला प्रयत्न. आणि दुसऱ्याच क्षणाला एकमेकांना नग्न पाहून घट्ट मिटलेले डोळे आणि तू आधी कपडे घालणार का मी यावरून डोळे बंद करून केलेलं भांडण. शेवटी दोघे सोबत कपडे घालू पण डोळे कोणी उघडणार
नाही असं ठरलं. नेमकं तू उलट टॉप घातलं आणि मी चोरून बघितलं म्हणून चिडलेली तू रूमभर आहे त्या अवस्थेत माझ्या मागे धावली होतीस.
रूमभर एकमेकांच्या मागे धावून दोघांना भूक लागली.आणि तू त्या दिवशी चक्क कारलं खाल्लं. आणि ते ही अगदी आवडीने.
अरेच्चा.!
डायरी तर उघडलीच नाही. तरी या आठवणी डोळ्यासमोर अगदी आत्ताच घडल्याप्रमाणे उभ्या राहिल्या. तू त्यादिवशी जातांना एक वाक्य बोलली होती."मला विसरून जा.!"
मला वाटलं होतं ठीक आहे डायरी नजरेआड केली म्हणजे मी तुला विसरून जाईल पण तसं झालं नाही. कारण आठवणींना टाळता येत अगदी थोड्या वेळासाठी. पण त्या मिटवता येत नाही रक्तातून.

-बुद्धभूषण जाधव
नाद खुळा लिखान
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा.!🙏
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा