एक वचन स्वार्थासाठी...

Image result for couple hug
"ऐ ऐक ना.!
मला काय वचन देणार तू आज." ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवत बोलली.
मी तिचा हातातील बोटांमध्ये माझ्या हाताची बोटे अडकवत,"काय वचन हवंय माझ्याकडून.!"
ती,"काय देऊ शकतोस?"
मी,"काहीच नाही.!"
ती(हसून),"हेच तुझं असणं कधी बदलू नकोस.!"
मी,"तुला का असं वाटलं की मी कोणासाठी बदलेल म्हणून."
ती,"खरचं रे! जसा आहेस तसाच रहा.बरं ते सोड! माझ्याकडून कोणतं वचन हवंय?"
मी,"कोणतं वचन घेऊ? काय देऊ शकतेस तू?"
ती,"तू सांग काय हवंय! मी तर माझं सर्वस्व तुला दिलंय.!"
मी(तिच्याकडे बघत),"हेच तर नकोय मला.मला तू हवी आहेस.तुझं सर्वस्व नकोय. तुला काय वाटतं, मी तुझ्या शरीरावर प्रेम करतो. तसं नाहीये गं! तुला माहीत आहे ना. मी तुला कधीच बेबी,जानू, शोना,राणी म्हणून हाक मारत नाही.मला भीती वाटते गं!माझं असं हाक मारण तुझे अस्तित्व नाकारण्याची सुरुवात नको व्हायला.  मला आज एक वचन दे! तू स्वार्थी होशील."
ती(घाईने माझ्या खंड्यावरचे डोके काढून माझ्याकडे बघत),"काय?"
Image result for couple hug
मी(तिला मिठीत ओढत),"खरंच! मला वाटतं तू स्वार्थी व्हावंस. स्वतःसाठी. तुझ्यातल्या 'तू'ला जिवंत ठेवण्यासाठी.आपलं नातं टिकवण्यासाठी.तूझ जे जे आहे ते अबाधित ठेवण्यासाठी.तू स्वार्थी व्हावंसं माझ्यासाठी. माझ्यात सामावताना तू आणि मी मिळून आपलं व्हावं. पण आपलं वेगळं करताना तुझ्या वाटेला फक्त मी नाही उरणार एवढा स्वार्थ जपायला शिक."
Image result for couple hug
तिने माझ्या गळ्यातील मिठी आणखी घट्ट करत माझ्या ओठांवर ओठ टेकवतं,"ये बात सिर्फ मेरे Writer_Saab बोल सकते हैं।" त्यानंतर ती आणि मी कधी आम्ही झालो हे कळालंच नाही.
-बुद्धभूषण जाधव.

टिप्पण्या

  1. तू स्वार्थी व्हावंसं माझ्यासाठी. माझ्यात सामावताना तू आणि मी मिळून आपलं व्हावं. पण आपलं वेगळं करताना तुझ्या वाटेला फक्त मी नाही उरणार एवढा स्वार्थ जपायला शिक."-खूप सुंदर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..