ब्रेकअप के बाद जिंदगी..

Image result for breakup
'प्रेमात पडण्याआधीच,
move on ची तयारी असावी.'

मी या मताचा माणूस आहे. म्हणजे होतो.
काय म्हणालात?
अडखळलो मी? नाही हो.! अडखळलो कुठे.! ते तर आपलं असंच.
पण खरं सांगू.!
हो.! मी अडखळतो.! जेव्हा प्रेमाचा मुद्दा येतो. मी अडखळतो जेव्हा विरह येतो. त्यात दुःख, कोसळणं, कोलमडण असं काहीच नसतं. त्यात असतो हरवलेला सहवास.संपलेला संवाद.दुरावलेलं मन.आणि सावरलेले आपणं.
प्रेमात माणूस पडतो. तर त्यातून बाहेर पडताना घडतो.
काय.? त्याच कारण.?
'मी'पणा.!
अहो.! खरचं भुवया काय उंचावता. जर तुमच्यात 'मी'पणा नसेल तर तुम्ही तिथेच गुटमळत राहणार.!
आणि हे धोकादायक असतं. त्यामुळे त्यातून बाहेर पडा.
कसं? त्या व्यक्तीला विसरून?
नाही हो.! संशोधन सांगते की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं त्या व्यक्तीपासून दूर झाल्यावर,वेगळं झाल्यावर त्याच्या आठवणीतुन बाहेर येण्यासाठी( आठवणीतून बाहेर येण्यासाठी विसरण्यासाठी नव्हे) पूर्ण 30 वर्ष लागतात. म्हणजे माणसाच्या सरासरी आयुष्याच्या १/३ काळ हा आपण एखाद्या व्यक्तीला विसरण्यासाठी खर्च करतो पण हाती काय येत? निराशा.
Image result for breakup memories
कसं असतं आपल्याला कितीही वाटलं मला त्या व्यक्तीला विसरायचं. तर ते विसरायचं हा शब्द बोलता बोलताच आपण त्या व्यक्तीच्या आठवणीशी स्पर्धा करू लागतो. जशी वाचताना सध्या तुमची माझी आणि प्रत्येकाची चालू आहे. पण आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करायलाचं हवे. म्हणजे माणसाला स्वतःच्या भावना कशा हाताळायच्या याचे भान येत. नातं जपायचं म्हणजे कायम घट्ट धरून न ठेवण्याची समज येते.
प्रेमात वेगळं होणं हे कायम टोकाचंच असावं. म्हणजे भावनांचा गुंता लवकर सुटतो. किंवा गुंता सुटत नाही म्हणून तोडल्याची अपराधी भावना आपल्या मनात राहत नाही. टोकाचं वेगळं होणं म्हणजे काय? तर यात वेगळं झालो म्हणून ओक्शाबोक्शी रडता आलं पाहिजे. मग ते रडताना तुम्ही मुलगा की मुलगी हा भेद तिथे येता कामा नये. कारण जीव लावताना हा विचार नसतो ना. की मुलगा आहे म्हणून कमी जीव लावेल. लावला लावला. मग गमावल्याच दुःख का मुलगा की मुलगी हे ठरवून व्यक्त करावं. शेवटी आभाळ तर दोघांचंही फाटतचं की.! आणि प्रेम ही भावनाच विलक्षण असते. म्हणून तर अमृता प्रीतम प्रेमावर बोलताना सहज म्हणून जाते,
"चादरी फाटली तर मी शिवून घेईल,
आभाळ फाटलं तर टाके कसे देऊ.!
नवरा मेला तर मी दुसरा करेल ही,
पण प्रियकर मेला तर कसं जगायचं.!"

या सहजपणात खूप काही दडलं आहे. ते सहजपण शोधण्यात आणि कोणाला तरी विसरण्यात आयुष्य खर्च करण्यापेक्षा ब्रेकअप के बाद जिंदगी..!! म्हणत पुढे चालायचं.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

  1. प्रेमापेक्षा आठवणीच सगळ्यात जास्त त्रासदायक असतात हो..!खूप छान मांडलाय विषय👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. दर्जा ना भाई... हे सगळं वाचत असताना एक व्यक्ती डोळ्यासमोर होती आणि ती तुला माहिती आहे कोण...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..