First kiss
त्यादिवशी नेहमीप्रमाणे बस खच्चून भरलेली होती.हालायलाही जागा नव्हती. मी आणि माझे काही मित्र उभे होतो. आम्ही आमच्यात गप्पात गुंग होतो पण तिथे आई सोबत बसलेल्या एका लहान मुलाने आमच्या बोलण्यावर जे प्रतिउत्तर दिले त्यामुळे आम्ही विचारात पडलो. खरंच आपण आपल्या देशात जी TV संस्कृती निर्माण करू लागलोय ती योग्य आहे? आपण वयाच्या आधीच तर मोठे नाही होत ना? आणि असंख्य प्रश्न उभे राहिले.
काही वेळापूर्वी....
आमच्या ग्रुप मधल्या एका जणांचेआयुष्यातील पहिले वाहिले किस झाला. तसं त्यात आज काही नवीन राहिलेलं नाही. पण त्याला चिडवायचे म्हणून आम्ही हम दिल दे चुके सनम फिल्म मध्ये जसं ऐश्वर्या सलमान खान ला म्हणते,'बच्चा हुआ तो?'(ते होतं नाही हे माहित असत) आम्ही ही त्याला म्हणत होतो आता मुलं होणार मग काय करणार? तितक्यात त्या ५-७ वय असलेल्या मुलाने आमच्या संभाषणात उडी मारली."दादा, काहीही म्हणतोय तू!" मी काही बोलायच्या आत तो पुढे बोलला,"किस केल्याने बाळ नाही होतं, tv मध्ये काहीही दाखवतात." मला या मुलाच्या बोलण्यावर कसं रिऍक्ट करावं कळतं नव्हतं. तितक्यात आमचा स्टॉप आला. आम्ही उतरलो पण मी अजूनही त्याच प्रश्नाचे उत्तर शोधत होतो. आपण tv मुळे प्रगती करतोय कि आपल्या मुलांचे बालपण गमावतोय?
लैंगीक शिक्षण महत्वाचे असावे पण कोणत्या वयात द्यावे ? हे ही तितकेच महत्वाचे आहे. ५-७ वयोगटातील मुलाला जेव्हा मुलं कसं जन्माला येतं हे tv पाहून कळतं तर ही नक्कीचं चिंतेची बाब बनतो.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा