कौमार्य (Virginity)

         बऱ्याच दिवसापासून या विषयावर बोलायचे होते. कौमार्य या विषयावर चर्चा सहसा आपल्या देशात होत नाही. कारण कौमार्य लग्नानंतर गमावतात असं आपल्या देशात केविलवाणा समज आहे. काही अंशी ते बरोबर ही असेल पण आजकाल मुले-मुली 20 ची होईपर्यंत एकदा तरी शारीरिक संबंध बनवतात. काही दिवसापुर्वी रणबीर कपूर ने जेव्हा एका मुलाखतीमध्ये सांगितले की त्याने वयाच्या १५व्या वर्षी कौमार्य गमावले. तेव्हा या गोष्टी ला मीडिया आणि समाजाच्या ठेकेदारांनीजी हवा दिली बघण्यासारखी होती.
        कौमार्य केव्हा गमवावे ही प्रत्येकाची व्यक्तीत बाब आहे. आणि यात पाप असं काही नसतं. कारण ज्या वेळी तुमचे मन आणि शरीर या शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार असेल तर त्यात काहीच वाईट नाही.  काही दिवसांपूर्वी एक बातमी पाहिली लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवताना रक्त नाही आले म्हणून पत्नीच्या चारित्यावर संशय आणि तिला माहेरी पाठवले. स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्या तरुणाने असे करणे किती लज्जास्पद आहे. खरं तर आपल्याकडे कौमार्य हा एका बंद पेटीतील विषय आहे. जो की कधी बंद रूम च्या बाहेर येऊ देत नाही आपण पण खरंच फक्त मुलींनी त्यांचे चारित्र्य सांबाळले पाहिजे का? मुलांची काहीच जबाबदारी बनत नाही का?
-बुद्धभूषण जाधव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..