आठवणीतला पाऊस

बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.मातीचा सुगंध हवेत मिसळत होता. पाऊस हा नेहमीच आपल्यासोबत काही जुन्या आठवणी घेऊन येतो आणि नवीन आठवणी देऊन जातो. पाऊस हा नेहमीच माझ्या जवळचा वाटतो.
पाऊस पडल्यावर लोकांना चहा-भजी खावी वाटतात. काहींना कविता कराव्या वाटतात.(काही लोकांना कविता होतात बरं का!) काहींना पावसात जाऊन भिजायला आवडते. पण मला मात्र खिडकीत बसून पावसाचे पडणारे पाणी पाहावेसे वाटते. हवेत मिसळलेला मातीचा सुगंध माझ्या आत्म्यामध्ये सामावून घ्यावा वाटतो.
आता मोठा झालोय तर मी लहानपणीचा आठवणीतला पाऊस खूप मिस करतो. ते शाळा सुटल्यावर पावसात भिजणे. मित्रांसोबत पावसात सायकल वरून कॉलनी मध्ये फेऱ्या मारणे. जोरदार झालेल्या पावसात रस्त्यावर साचलेले पाणी पाहून त्यात उड्या मारणे. कॉलेज मध्ये असताना पावसात भिजल्यावर थंडी वाजू नये म्हणून आपल्या आयुष्यातील पहिलीवहिली ती. तिच्या सोबत एकाच कपात पिलेली चहा.मला आज पर्यंत आठवत नाही थंडी चहाने पळायची की एकाच कप मध्ये चहा घेतली या आनंदात थंडीचा विसर पडायचा पण नक्कीच ती चहा आता जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. चहा पिताना नेहमी लक्ष चोर नजरेने कपाकडे असायचे ती चहा संपवले या कडे नाही तर तिच्या ओठांचा स्पर्श कपाला कुठे झाला तिचा लिपस्टिक चा मार्क बघून तिथूनच चहाचा घोट अमृत मिळाल्याच्या अविर्भावात प्यायचा. आज हे खूप मूर्खपणाचे वाटत असले तरी पाऊस पडल्यावर याच आठवणी चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..