दुःखाचे भाषांतर..
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ॥
नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे ॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥
दुःख म्हणजे काय ? हे मला माहीत नाही. 'मी कधी दुःख सोसलेच नाही.' असं म्हणणारा माणूस या जगात शोधून ही सापडायचा नाही. कारण दुःख भोगले तेव्हाच सुख कळते. फक्त आपण सुखाला पाहून दुःखाची हेटाळणी करतो. कारण सुख हे आपलं वाटत दुःख हे आपल नसतंच कधी. म्हणून तर दुःख आले की लगेच आपण म्हणतो,"आलीया भोगासी असावे सादर!" का दुःख हे आपल्याला नशिबाचे भोग वाटतं सुखाला आपण कधी असे म्हणतो का? की सुख हे नशिबाने आले तेव्हा आपण म्हणतो ते माझ्या मेहनतीचे फळ आहे. खूप विचित्र आहे ना. कारण सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आपल्याला कळते.
सुखाच्यामागे धावण्यात आपण दुःखाला पोरकं करून टाकलं. दुःखाला स्वतःच्या कुशीत कोणी बसवलं असेल तर ते कवी, शायर अशा साहित्यिकांनी त्यांनी दुःखाचे वर्णन इतके चपखळरित्या केले. पण एखादा कवी किंवा शायर जेव्हा दुःखाचे वर्णन नाही दुःखाचे भाषांतर(वर्णन तर सुखाचे असते दुःखाचे नव्हे) शब्दात करतो तेव्हा लोकांनकडून मिळणारा आहह! वाह! त्या दुःखाला आपल्यात सामावून घेतात.आणि खरं सांगायचे तर हे भाषांतर ज्याला जमलं समजलं त्याला आयुष्य कळले.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा