तुझं breakup झालंय का??

"तुझं ब्रेकअप झालंय?"
हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो म्हणजे १० पैकी ८ जण तर नक्की विचारतात. का विचारतात हे मला माहित असतं तरी आपलं त्यांच मन ठेवण्यासाठी म्हणून मी ही निरागसपणे विचारतो,"का बरं असं वाटलं तुम्हाला?" पण त्यांचे उत्तर ऐकून पूर्वी मला खूप राग यायचा पण आता हसू येते खरं तर कीव येते. अरे हो त्यांचे उत्तर सांगायचे राहिले,"नाही तू हल्ली कविता करतो म्हणून आपलं विचारलं!"
तसं पाहता त्यांची काही चूक नाहीये त्यात कारण आपला भारतीय समाज चित्रपटाला इतकं खरं मानतो,की आपल्याला ते चित्रपटातील प्रेमभंग झालेल्या नायकाप्रमाणे प्रत्येक कवी तसा भासू लागतो. काही कवी असतात ही तसे जे प्रेमभंगातून सावरण्यासाठी कविता करतं असतील. पण दर वेळेला तसं नसतं.
काही कवी निसर्गाच्या प्रेमात पडतात म्हणून कविता करतात. काही कवी निर्जीव वस्तूसाठी कविता करतात. आणि माझ्याबद्धल म्हणालं तर मी स्वतःवर प्रेम करतो म्हणून कविता करतो. सगळ्यात महत्वाचा कविता करण्यासाठी दुःख कवटाळावे लागत नाही. तुम्ही सुख कवटाळले तरी कवी होऊ शकता. फक्त आयुष्याचे धडे तुम्हाला कळले पाहीजे.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..