मनाच्या अडगळीत पडलेले पत्र..💌

प्रिय ***,
      तुला पाहिल्यावेळेस कुठे पाहिलं हेही आता आठवत नाही. आणि खरं सांगायचं तर मीही आता आठवत बसत नाही. कारण मला आता तुझी सवय झालीये. सवय नाही गं! तू तर आता माझ्यात भिनली आहेस. मला माहित आहे हे वाचून तू मला मूर्ख! नक्कीच म्हणाली असशील. तसं ही आता तुझं माझ्यावर चिडणं, रुसणं,रागावणं सर्व काही आता मला आवडत. का?माहिती आहे! कारण आपल्यावर हक्क नाही प्रेमाचा हक्क गाजवणारी कोणी तरी आहे ही भावना आम्हा मुलांना खूप सुखावते.आणि त्यापेक्षा सुखावणारी गोष्ट माझ्यासाठी काय असेल माहिती आहे का? जेव्हा तू मला रात्री झोपेतून उठवतेस आणि म्हणतेस,'मला झोप नाही येत तू माझ्या सोबत गप्पा मार!' खरंच त्यावेळी मी तुझ्या प्रेमात नव्याने पडतो. जेव्हा तू मला ५ मिनिटात आले सांगून अर्धा तास बस स्टॉप वर थांबवते.
       तुला आठवते आपण पावसात भिजलो होतो तेव्हा तू आणि मी एकाच कप मध्ये कॉफी घेतली होतो. खरं सांगतो आज पर्यंत तशी कॉफी मला कुठे ही मिळाली नाही अगदी त्या कॉफी शॉपमध्ये सुध्दा. कॉलेजच्या नाटकात असताना तू मला नाटकाचा भाग म्हणून का होईना, तू माझ्या मिठीत आली होतीस. त्यावेळी जर देवाने मला विचारलं असत कि बोल तुला काय देऊ? तर मी क्षणाचा ही विलंब न करता म्हणालो असतो,'फक्त या क्षणाला इथेच थांबव हिला असच माझ्या मिठीत राहू दे आयुष्यभरासाठी.'
        तुला त्रास द्यायचा म्हणून मी तुला न सांगता आपल्या ग्रुपच्या तिच्याबरोबर (नाव मुद्धाम वगळले) movie ला गेलो होतो कारण मला माहित होत ती एकच अशी मुलगी आहे. जी तुला येऊन सांगेल आणि झालंही तसंच. तिने तुला येऊन सांगितलं. खरंच
त्यावेळी तू माझ्यावर रागावली होतीस म्हणून कित्येक दिवस रुसली होतीस. तेव्हा खरंच मला खूप मजा आली होती. कारण तू माझ्यावर अधिकार गाजवत होतीस.आणि मला ही तेच हवं होतं. हे सर्व आज लिहलं कारण मी तुझ्यात गुंतत होतो पण व्यक्त होत नव्हतो. म्हणून हे मनाच्या अडगळीत पडलेले पत्र तुझ्यासाठी.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..