अजीब दास्ता है ये.!!
कोई मंगदा मेरा सी समां कोई हौंदा सूरत ते फ़िदा कोई मंगदा मेरी सी वफ़ा ना तो मंगदा मेरियां बला.. हे ऐकलं आणि चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आणि खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीत डोळ्याने शोधू लागलो कोणाच्या मोबाईलची रिंगटोन आहे. आणि नजर दारात उभ्या चार पाच मुलींच्या गोळक्यावर थांबली. खूप प्रयत्न केला तिला बघण्याचा पण आणि ती दिसली. पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेली. त्यामुळे चेहरा काही दिसला नाही. पण मोबाइल कानाला लावला तेव्हा तिच्या हाताच्या नखांवर केलेलं नक्षीकाम जाम आवडलं. लोकलच्या गर्दीतून एक एक पाऊल पुढे सरकणे किती अवघड हे सर्वांनाच माहीत. तरी मी जीवाची बाजी लावून प्रयत्न करत होतो. पण.. मी ध्येय गाठण्यापूर्वीच तिने ध्येय गाठलं. म्हणजे तीच स्टेशन आलं. मग काय? तोंड पाडून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. माझं आता रोजच काम झालं होतं ती आज दिसेल,आज दिसेल,आज दिसेल पण ती काही दिसेना. असेच २१ दिवस गेले. २२ व्या दिवशी मी तिचा थोडाही विचार न करता. बसायला जागा भेटली या आनंदात खिडकीतून बाहेर बघत होतो तितक्याच बाजूला एक मुलगी येऊन बसली. तिच्या Perfume चा सुगंध छान होता. म्हणजे दिवसभराचा थकवा गेला. मी तिच्य...