न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये
जोरात दार आपटतं ती सोफ्यावर येऊन बसली,"मी थकले आता.!"
तो लॅपटॉप वरची नजर न हलू देता,"काय झालं? कोणी काही बोललं का?परत.!"
ती,"तू ते लॅपटॉप आधी बाजूला कर नाहीतर बाल्कनीतून खाली फेकेल.!"
तो(लॅपटॉप वरची नजर अलगत तिच्याकडे वळवत),"बोला.! कोण काय म्हणाल आज मॅडम ला!"
ती(चिडून),"ज्याने बोलायला पाहिजे तो बोलत नाही आणि बाकीचे लोक शांत होत नाही."
तो,"तुला सगळं माहीत आहे. तरी असं बोलू लागली तू.!"
ती(डोक्याला हात लावत),"आता एकाच पर्याय आहे.! लग्न."
तो,"लग्न करायचं? Seriously"
ती,"का तुला नाही करायचं?"
तो,"मी कधी तुला बायकोच्या भूमिकेत बसवलंच नाही.! तू प्रियसी आहे माझी."
ती(रागात उभी राहून),"ठीक आहे.मी तुझ्यासाठी फक्त एक गरज होती.पण आता मला तुझी गरज नाहीये.. Good Bye Forever.!" आणि ती निघून गेली

साधारण २३ महिन्यानंतर...
ती परत त्याच्या फ्लॅटची बेल वाजवत परत आली.
तो(दार उघडत),"ये.! आज कसं काय येणं केलंस?"
ती,"का?यायला नाही पाहिजे का?"
तो,"तसं नाही गं.! मला वाटलं लग्न केले असेल तू आतापर्यंत."
ती(हसून),"केलं ना! खूप सुखाचा संसार होता आमचा पण..."
तो,"पण काय??
ती,"तू तिथेही आलाच ढवळाढवळ करायला."
तो,"काय? मी?"
ती,"हो! मला तुझी सवय झाली होती. तुझा स्पर्श तुझा गंध.(थोडस हसून)तुझी गरज पूर्ण करता करता मलाच तुझी गरज भासू लागली."
तो,"एक मिनिट.!तू कधीच माझी गरज नव्हतीस. मी प्रेम केलं होतं तुझ्यावर."
ती,"केलं होतंस? मी तर आजही करते.(थोडं थांबून. त्याच्या ऐश ट्रे कडे बघत.)तू आजही सिगारेट अर्धीच पितोस."
तो,"त्याच काय आहे ना.! मला सवयी इतक्या सहज बदलता नाही येत तुझ्यासारखं."

ती,"तुला कसं सांगू! मी खूप मिस करते तूझी ती घट्ट मिठी.! तुझं ते मोहकपणे जवळ येणं ते १२ सेकंदाच चुंबन, तुझं मला कुरवाळण. माझ्या केसांतून हळुवारपणे बोट फिरवत ओठ एकमेकांना भिडून सुंदर असं संगीत रचणं"
तो मधेच बोलत,"तुझं थोडंस डोकं मागं झुकलेल, केस कंबरेपर्यंत पोहोचलेले..माझ्या मानेभोवती बाहुंचा विळखा,पाठीची कमान ताणलेली... डोळे मिटलेले आणि मुख-दार उघडून माझ्या शोधक जिभेचा सुखद स्वाद घेता येईल इतकं खुलं.."
ती त्याच्या जवळ येतं,"मला परत जगायचा आहे तो क्षण. त्याच्याजवळ येतं."
तो थोडासा बाजूला सरकत,"कसं असतं ना.!पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून सोडते.त्यातलं काय लुटायचं ह्याच आकलन होण्यापूर्वीच ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते.आपण तसेच काठावर निथळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो हवं असलेलं सगळं देऊन कुणीतरी चकवल्यासारखं. आणि परत निथळत्या सुख नकोय मला."

एखाद्या लहान मुलाला आवडती खेळणी नाही मिळाली तर तो जसं निरागसपणे रागावतो तसं ती रागावली होती. पण व्यक्त होऊ शकत नव्हती.
तो," बरं तू बस आपण मस्त कॉफी पिऊ.!
तो कॉफी घेऊन येतो आणि रेडिओ चालू करतो(तिला कॉफी पितांना रेडिओ ऐकायला खूप आवडायचे) आणि रेडिओ वर गुमराह सिनेमाचं गाणं चालू होतं.
चलो इक बार फिर से
अजनबी बन जाएं हम दोनों
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ
दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो
गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये
मेरी बातों में
न ज़ाहिर हो तुम्हारी
कश्मकश का राज़ नज़रों से
अजनबी बन जाएं हम दोनों
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ
दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो
गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये
मेरी बातों में
न ज़ाहिर हो तुम्हारी
कश्मकश का राज़ नज़रों से
तो (हसून),"हेच तर मी तुला सांगत होतो."
आणि ती लक्ष नसल्याप्रमाणे कॉफी संपवून निघून गेली.तेही bye न करता...
आणि ती लक्ष नसल्याप्रमाणे कॉफी संपवून निघून गेली.तेही bye न करता...
-बुद्धभूषण जाधव
व्वा.. छान वाटलं वाचुन
उत्तर द्याहटवाDhanyawaad..
हटवाNice
उत्तर द्याहटवाThankyou.
हटवाNice
उत्तर द्याहटवा