ते आपलं नातं.. विश्वासच
त्या दिवशी सकाळी तु उठलीस तेव्हा तुला फार विचित्र वाटत होते. नाही कदाचित अवघडली असशील. हो ना! पण खरं सांगतो त्यारात्री मीही तितकाच अवघडलो होतो. का?? अगं, माझ्या बाहुपाशात तू विसावली होतीस. हे वेगळं कि तू त्या वेळी नशेत होतीस. खरं तर मला खूप राग येतो तुझा कारण तू दरवेळी मला Promise करतेस की तू drugs परत घेणार नाही. आणि तू दर वेळेस घेतेस आणि मीही मूर्ख दरवेळी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कदाचित यालाच आंधळं प्रेम म्हणतात.असो
मला तुला हेच सांगायचं होत की त्या रात्री तू माझ्यात सामावू पाहत होती आणि मीही तुझ्यात सामावू पाहत होतो.पण मला माहित होत मी तुला माझ्यात कितीही सामावलं तरी तू मात्र त्या नशेत सामावत होतीस.म्हणून स्वतःला आवरण गरजेचं झालं होतं. पण त्या दिवशी तू नशेत जे काही बोलली खरं सांगतो ते कदाचित तू कधीच नसती बोलू शकली. काय झालं! विचार करू लागलीस? तू काय बोलली होतीस! सांगू मी? जाऊदे नाही सांगत! बरं सांगून टाकतो. कसं आहे ना! मला बघवत नाही तुला असं दुःखी! बरं ऐक! तू मला म्हणालीस,"Thankyou माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.मी कायम आधार शोधत शोधत मोठे झाले.आधार मिळाला पण कधी घाणयेरड्या नजरेचा तर कधी घाणयेरड्या स्पर्शाचा.तू माझ्या आयुष्यातील तो आधार आहे जिथे तोल गेला तर भीती वाटत नाही.कारण माहीत असतं तू मला सावरशील. आणि तू जर असंच आयुष्यभर सावरणार असशील तर मी आयुष्यभर अडखळायला तयार आहे." तू बोलली ते खूप फिल्मी होतं. पण इतकं मात्र खरं की तू drugs घेतेस हे आम्हाला दिसत पण का घेते हे आम्हाला दिसत नाही.
तर आज Friendship Day आहे वाटतं. म्हणजे सगळे म्हणत होते.म्हणून म्हंटलं तुला ही बोलावं.पण मग विचार आला खरंच friendship day साजरा करावा इतकं एक दिवसाचं नातं आहे का आपलं? पण दिवसाचे निम्मित साधून तुला इतकंच सांगायचे आहे.मी तुला आयुष्यभर सावरायला तयार आहे फक्त तू जशी आहेस तशीच आयुष्यभर रहा कारण तुझ्यातील दुःखाला तू कधीही तुझ्यावर हावी नाही होऊ देत. हा तुझ्यातील सगळ्यात मोठा चांगला गुण आहे.फक्त drugs सोडायचा प्रयत्न कर.कारण तू माझी हक्काची आहे म्हणून हक्काने सांगत आहे.
Happy Friendship Day.!!
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा