समंजस प्रेम...
आदित्यचं आज पहिलं लग्न त्याच्या दुसऱ्या प्रेमासोबत.हो! दुसरं प्रेम... काय झालं? का? प्रेम होत नाही दुसऱ्यावेळी. होतं नक्कीचं होतं पण ते पहिल्या प्रेमासारखं स्वप्नाळू नसतं, त्याला वास्तव्याची जाण असते.आदित्यसाठी पहिलं प्रेम म्हणजे एक सिनेमातील लव्ह स्टोरी होती. ती दिसली की त्याला आजूबाजूचा विसर पडायचा.तासनतास फोन वर बोलायचा. हे प्रेम खूप स्वप्नाळू होते कारण ते दोघे कधी वर्तमानात जगत नव्हते.तो तिच्यासाठी तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा मार्ग होता तर त्याच्यासाठी ती फक्त सुंदर स्वप्न होती जे कधीही तुटेल असं पण त्याला हे कधी कळालंच नाही. दुधात माशी पडावी तसच काही तरी त्यांच्या आयुष्यात झालं. ते एकमेकांसोबत फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी होते. कारण दोघांनी ही आपला आपला भावनिक आधार शोधला होता. आणि ते नातं केव्हा संपलं हे त्यांना ही कळालं नाही.
या नात्याचं असं संपणे दोघांसाठी ही धक्का होता. या घटनेमुळे आदित्य पुरता डिप्रेशन मध्ये गेला होता. त्याच्या करिअर ला उतरती कळा लागली होती.तो तासनतास एकाच रूम मध्ये घालवत होता.तेव्हा त्यांच्या आयुष्यात ती आली.हो ती त्याच दुसरं प्रेम तिने त्याला सावरलं होतं. तिच्या आयुष्यात ही हे पहिलं प्रेम नव्हतं. त्यामुळे हे नातं उथळ पाण्यासारखं खळखळत नव्हतं. ये नातं संथ गतीने पुढे पुढे जात होते.आणि आज याचं नात्याला एक नवी ओळख मिळणार होती. अशी ओळख जी आयुष्यभरासाठी असेल.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा