जोडीदार...
अजय प्रियाकडे एकटक पाहत होतो.तितक्यात मोबाईलची message tone वाजली.प्रिया जागी होईल म्हणून अजयने घाई घाई मोबाईल हातात घेतला.मेसेज पाहिला नाही पण वेळ बघितली तर 8:45am. म्हणजे गेली कित्येक घटिका त्याने तिला पाहत घालवली होती. अजयने मोबाईल बाजूला सारला आणि परत तिच्या तोंडाजवळ तोंड ठेऊन तो विसावला.कारण त्याला या क्षणांना इथेच थांबवायचे होते. त्याला माहित हाेत असे क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही म्हणजे निदान लग्नाआधी तरी येणार नाही. तिचे गरम श्वास त्याच्या गालाला स्पर्श करत होते. तिच्या गालावर आलेले ते केस त्याला हसत होते.जणू त्यांच्या मिलनाचे साक्षीदार असल्याप्रमाणे.त्याने पलंगापासून काही अंतरावर असलेल्या आरशात पहिले तर त्याच्या मानेवर काही love bites दिसले.पहिली वेळ असल्यामुळे तो लाजला आणि परत परत हात लावू लागला.आता तिला जागं येत आहे हे पाहून त्याने लगेच झोपेचे सोंग घेतले.ती उठली, तिने बेडपासून केव्हाच बाजूला पडलेलं बेडशीट स्वतःभोवती गुंडाळले आणि त्याच्या छातीवर डोके ठेऊन बोलू लागली,"माहित नाही, काल जे घडले ते योग्य होत की अयोग्य पण माझ्यासाठी कालची रात माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती.आपल्या नात्याला कोण काय नाव देईल माहित नाही पण मला खात्री झाली की तू माझ्या साठी योग्य जोडीदार आहेस.तुला माहित नसेल पण तू कधी मला एखाद्या लहान मुलीसारखे वागवतो तर कधी एखाद्या मैत्रिणी सारखं. पण काल रात्री तू मला तुझ्या बायकोप्रमाणे वागवलं. तू तुला हवं तर कधीच माझ्यासोबत मिलन करू शकला असता पण तू माझ्या संमतीसाठी थांबला.तेव्हाच मी ठरवलं की असा जोडीदार मिळणे शक्य नाही.लग्नानंतर कोणता पुरुष असतो जो त्याच्या बायकोला विचारून संबंध ठेवतो? असतील हि कदाचित बोटावर मोजण्याइतके पण त्यातील एक मला मिळाला. मी आता तुझ्याशिवाय जगायचा विचारही नाही करू शकत."तीने मान उचलली आणि त्याच्या ओठावर अलगत ओठ टेकवले.स्वतःचे कपडे उचलून बाथरूम मध्ये गेली. त्याने दार बंद झाल्याच्या आवाजाने डोळे उघडले.आणि स्वतःलाच तिला आयुष्यभर असेच सुखी ठेवण्याचे वचन देऊन पुन्हा रात्रीच्या च्या क्षणास आठवू लागला.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा