बस स्टॉप..
ती मला बस स्टॉप वर दिसली होती. नक्कीच तिने ही इतर मुलींप्रमाणे तोंडाला रुमाल बांधला होता.पण का कुणास ठाऊक मी फक्त तिलाच पाहिलं त्या दिवशी. ती थोडी दूर उभी होती.तिचा आवाज येत नव्हता पण तिची प्रत्येक हालचाल मी साठवून ठेवतं होतो.जणू काही आज मी तिला शेवटचं पाहत होतो.बसला उशीर झाला तसं स्टॉपवर गर्दी वाढत होती. कदाचित मी तिला बोलायची हिम्मत करू शकत नाही हे माहीत होतं. तितक्यात बस आली.तिला बसायला जागा मिळाली. मी असा उभा राहिलो की मला ती दिसयला हवी. त्या 20 मिनिटांच्या प्रवासात मी आयुष्यभराचा प्रवास केला होता. काही दिवसात जणू ती माझी सवय झाली होती. रोज तिला पाहण्यासाठी मी स्टॉप वर तासभर आधीच जात, माहिती असायचं ती रोजच्या वेळेला येईल.पण मला ते आवडायचं तासभर तिच्या वाटेकडे बघायला.आणि ती दिसली की जग जिंकल्याचा आनंदात सगळीकडे बघायचं. एकदा अचानक म्हणा किंवा देवाला माझी तळमळ कळली म्हणून म्हणा. पण मला तिच्याशेजारी जागा मिळाली होती.माझं काळीज इतकं जोरजोरात धडधडू लागलं.एक वेळ तर असं वाटलं की धडधड थांबवू की काय?जर तिला ऐकू गेलं तर? मी विचार करतच होतो की तितक्यात तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झालं. खरंच जर तेव्हा माझा जोर चालला असता तर मी तो क्षण धरून ठेवला असता.
असं म्हणतात की स्वप्न कितीही सुंदर असलं तरी डोळे उघडल्यावर मोडते.तसं काही झालं होतं माझ्यासोबत. कॉलेज संपलं तसं ते स्वप्न तुटलं.उरल्या फक्त धूसर झालेल्या त्या ओल्या आठवणी.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा