हातात हात हवा...

(अंग, आज सकाळी काय म्हणून कपाट आवरायला घेतले.तर त्यात तुला लिहलेलं पत्र सापडलं.आणि मजा म्हणजे ते पत्र तुला लिहले पण ते कधी या पुस्तकातून त्या पुस्तकात असे करत सगळ्या घरात फिरले.फक्त तुझ्यापर्यंत नाही आले. हल्ली तर मी कोणते ही जुने पुस्तक वाचायला काढले की असं वाटतं त्या पुस्तकाला माझे सगळे गुपितं माहित आहे म्हणून ते माझ्याकडे मिश्किल हास्य घेऊन पाहत आहे. आता ही पत्र तुला द्यावं की पुन्हा लपून ठेवू समजत नव्हतं. पण म्हंटलं आज होऊनच जाऊ दे. आर नहीं तो पार)

प्रिय,
काय लिहू?
तुला मी हल्ली इतक्या काही बाही नावाने बोलावतो की इथे काय लिहू? पण खरं सांगू यात माझी काहीच चूक नाहीये. का? म्हणजे अंग मी तुला कुठल्याही नावाने हाक मारतो. आणि तुही प्रत्येक नावाला ओ!! देतेस.मग यात माझी काय चूक सांग बरं. बरं आता रागावू नकोस, तुझे लाल झालेले नाक बघायला मी तिथे नाहीये.तर राग थोडा बाजूला ठेवं आणि ती गालावर आलेली बट खेळू नकोस. त्या बट सोबत खेळण्याचा माझा अधिकार आहे. मी तुला इतकी वर्षे ओळखतो पण मला एक सांग? मी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सांगायला तुझ्याजवळ का येतो? तू थोडी नजरेसमोरून दूर झालीस कि अस्वस्थ का होतो? मी गेली कित्येक दिवस ये उत्तर शोधतं आहे.तुचं मला आता याचे उत्तर सांग.असं का होत असेल. एक विचारू, राग येणार नसेल तर? मी तुझ्या प्रेमात तर नाहीये ना? आणि जर हे प्रेम असेल तर मला आवडेल आयुष्यभर असा वेंधळेपणा करायला. अजून ३०-४० वर्षानंतर तुला आवडेल का? माझ्या सोबत घरभर माझा चष्मा शोधायला?आणि शोधून शोधून डोक्याला हात लावला की चष्मा डोक्यावर सापडाला म्हणून तू रुसून बसायचं आणि मग मी तुझ्यासाठी माझ्या भेसूर आवाजात गाणे म्हणेल 'पल पल दिल के पास' आणि तू नवीन नवरीप्रमाणे लाजयचं. माझ्या थरथरणाऱ्या हातात तुझा सुर्कुटलेला हात देऊन माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन बाल्कनीत बसायला.आवडेल का तुला? मला हे मोठं आयुष्य एकटं जगायचा कंटाळा आलाय. तू माझी साथ देशील. फक्त आयुष्यभरासाठी. जास्त काही मागत ही नाही.
तुझाचं,
तो

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..