गुलाब सुकले आहे..
काल आम्ही शाळेतील सगळे मित्र-मैत्रिणी एका मित्राच्या घरी जेवायला म्हणून गेलो होतो. कारण होत त्याने घेतलेलं स्वतःच घर. तसं तो माझा Best Friend असल्यामुळे माझे रोज त्याच्याशी बोलणे होते.पण बाकींच्यासोबत माझा तसा काही संपर्क नव्हता.मी त्याच्या घरी गेलो तर दार उघडले त्याच्या होणाऱ्या बायकोने म्हणजे ती आमच्या सोबत engineering ला होती त्यामुळे मी तिला चिडवायचो.
"काय मग वहिणीसाहेब.!काय म्हणता?"मी
ती हसून, "तू कधीच नाही सुधारणार."
मी,"अर्थात.!"
ती, बरं ये, meet my friend.!
तिने बहुदा तिचे नाव घेतले होते पण मी ऐकलेच नाही.कारण तिला पाहून मी भूतकाळात गेलो होतो. ती माझ्या शाळेतील सर्वांत सुंदर मुलगी होती. जिच्यावर शाळेतील प्रत्येक मुलगा जीव ओवाळून टाकायला तयार होता. माझ्यासाठी ती एक चांगली मैत्रीण होती. ती सुद्धा तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगायची. आमचं नात म्हणजे मैत्रीच्या थोडं पलिकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे होतं. (अगदी स्वप्नील जोशी बोलतो तसं.) प्रेमाची व्याख्या कदाचित मला तेव्हा करता ही येत नव्हती आणि सांगता तर मुळीच येत नव्हती. मला ती आवडायची म्हणजे बाकी मुलांप्रमाणे तिचे दिसणं नाही तर तिचं असणं. मला जास्त आवडायचं. सगळं काही एखाद्या गोष्टी सारखं चाललं होतं. पण आमच्यात तो आला. तोच तो Propose Day.!! त्या एका दिवसांनी पूर्ण आयुष्य बदलून गेलं. एका सुंदर नात्याला पूर्णविराम मिळालं. पण अश्या ठिकाणी जिथे कदाचित दोघांच्याही मुक्कामाचे ठिकाण नव्हते.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा