मेरा वो सामान लौटा दो...
आज जवळ जवळ ४ वर्षांनंतर ती मला दिसली. आज ही चेहऱ्यावर तोच निरागसभाव होता. तिला समोर बघून काय बोलावे कळत नव्हते. फक्त एक स्मितहास्य केलं. पण आज त्या हास्यात खूप अनोळखी भाव होते.तिलापाहुन हृदयाला आवरण अवघड झाले आणि मी पटकन बोलून गेलो. "Coffee घेणार!" तिने फक्त मानेनेच होकार दर्शवला. जवळच्या एका कॉफीशॉप मध्ये गेलो जिथे आम्ही नेहमी भेटायचो. तिथे गेलो तर वेटर आला आणि म्हणाला,"खूप दिवसानंतर आलात सर, कुठे shift केलं का?" मी तिच्याकडे पासून वेटर ला बोललो,"हो! आता खूप दूर shift केलंय .!" ती माझ्यापासून नजर चोरत होती. नंतर चे ५ मिनटं वेटर येउपर्यंत आमच्या टेबलवर इतकी भयाण शांतता होती की जणू आता ती शांतता आम्हाला गिळून टाकेल. शेवटी पुढाकार घेऊन मीच सुरुवात गेली-
"मग काय चालू आहे आता?"
ती - सगळं छान चालू आहे
मी(हसून) -खरंच, जरी आपल्यात आज काही नसलं तरी तुझ्या चेहर्यावरचे भाव मी आजही तितक्याच स्पष्टपणे वाचू शकतो.
ती(माझ्याकडे पाहून) - पण आज तुझ्या चेहर्यावर खूप समाधान आहे. किती लवकर move on केलंस तू.!
मी - लवकर? तुला माहित नसेल पण ४ वर्ष हा खूप मोठा काळ असतो.! जेव्हा कोणी तुम्हाला एकटं सोडून जात.
ती - हो पण ८ वर्षांच्या नात्यापेक्षा तर नक्कीच लहान आहे.!
मी - त्यावेळी मला सोडायचा निर्णय तुझा होता, कारण तुला एक secure आयुष्य हवं होतं जे मी तुला तेव्हा काय आज ही नाही देऊ शकतं!
ती - हाच तर प्रॉब्लेम आहे तू आज ही मला गृहीत धरतो.
मी - तुला आणि गृहीत! संबध काय आहे. तू मघापासून ते मंगळसूत्र ओढणीचे लपवत आहेस. आणि मी तुला गृहीत धरतो. (थोडं थांबून) कमाल आहे.!
ती - मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात.!
मी - नक्कीच.एका 5BHK फ्लॅटची मालकीण आहेस फिरायला एकटीला का होईना पण एक महागडी कार आहे. अजून काय पाहिजे जगायला.
ती coffee एव्हाना थंडी झाली होती ती टेबलवरून फक्त आमचं बोलणं ऐकत होती.
ती - तू कधीच नाही समजून घेऊ शकणार मला.!
मी - तू समजून घेतलं होतंस मला? जेव्हा मी तुला सांगायला आलो की मी इंजिनिर ची नौकरी नाही करणार.
ती - i think मी आता निघायला पाहिजे. आणि sorry तुझा वेळ घेतल्याबद्दल.!
मी - U Should.!
ती उठली आणि चालू लागली. कॅफे च्या दारापाशी जाऊन मागे वळून पाहिलं आणि तू अशक्य आहेस अशा अविर्भावाने मान हलवून निघून गेली..
मी ती थंडी coffee पीत होतो आणि कॅफेमध्ये बॅकग्राऊंग ला song चालू होते -
"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है
सावन के कुछ भीगे-भीगे दिन रखे हैं
और मेरे इक खत में लिपटी राख पड़ी है
वो राख बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो"
आणि मी ती coffee enjoy करतं होतो.
-बुद्धभूषण जाधव
गेलेल्या माणसे परत येत नसतात ...... आठवणी मात्र सोबत राहतात
उत्तर द्याहटवा