ती, तो आणि बाक...

'मला तुला भेटायचे आहे!'
सकाळचे ६ वाजले होते. इतक्या सकाळी तिचा message पाहून तो हसला. तिचा नंबर आता saved नसला तरी आजही त्याला पाठ होता.अगदी आठवणीप्रमाणे ती आज सोबत नव्हती पण तो आजही तिच्या आठवणीतून सावरत होता. त्याने तिला message केला-' केव्हा आणि कुठे'
तिने लगेच रिप्लाय दिला जणू काही ती त्याच्याच message ची वाट पाहत होती. ती - 'आपल्या नेहमीच्या बाकावर'
तो -'अच्छा, तुझ्या लक्षात आहे तर!'
तितक्यात त्याची बायको किचन मधून ओरडली,"बस्स झालं.! आवरा पटकन घंटा झाला मोबाईलला  चिटकून.!"
त्याने mobile silent mode ला टाकला. आणि बाथरूम मध्ये गेला. खरंतर मोबाईल silent करण्याची काहीच गरज नव्हती. पण कॉलेजच्या मैत्रिणीचा message बघून तो स्वतःला college boy समजत होता. आवरून तो ऑफिस ला निघाला तितक्यात मोबाईल वर message आला 'संध्याकाळी भेटू 6:30pm'
त्याने रिप्लाय दिला, 'तू अजूनही message करायला शिकली नाहीसं'
ती - तू नव्हतास ना!
त्याने आता रिप्लाय दिला नाही.
संध्याकाळी ६ वाजेला ....
तो त्या बागेतल्या बाकावर येऊन बसला होता. शर्ट च्या आतून डोकावणारे पोट तो सारखं आतमध्ये करून बोलण्याचा प्रयत्न करत होता.पण तोंडातून शब्द बाहेर पडला की पोट ही बाहेर येत होतं. तितक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.त्याने मागे वळून पाहिले तर त्याला जशी अपेक्षित होती अगदी तशीच ती समोर उभी होती. तोच सडपातळ बांदा.चेहऱ्यावर तेज. ती त्याच्या शेजारी बसली.
ती- तू कामात तर नव्हतास ना?
तो- नाही गं! आपल्यात इतकी formality.?
ती- का नाही! मी आता कोणाच्या तरी नावाचे मंगळसूत्र घालते,आणि तुझ्या नावाचे ही मंगळसूत्र घालणारी आहे आता.!
तो- ह्म्म
ती- मला तुला काही सांगायचे आहे.
तो- काय?
ती- माझे लग्न सुमीत सोबत नाही झाले.!
तो- मग.
ती- मी प्रशांत सोबत लग्न केलं.
तो- काय? तो आपल्या वर्गातला प्रशांत. ज्याला तू अमोल पालेकर चिडवायचीसं.
तीने फक्त मानेनेच होकार दिला.
तो-पण हे सगळं कसं झालं.
ती- माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मला कळले की मी pregnant आहे.
तो- काय?
ती- हो त्यामुळे माझे लग्न मोडले.त्याच वेळी प्रशांत ने मला मागणी घातली. माझ्या घरच्यांसाठी तो देवमाणूस झाला. मी ही लग्नाला तयार झाले. कारण तो मला माझ्या बाळासह स्वीकारणार होता.
तो- sorry.! पण एक विचारू?
ती- काय? त्या बाळाचा बाप कोण?
तो- हो.!
ती- हा काय माझ्या समोर बसला आहे!
हे ऐकून आता त्याचे डोके बधिर झाले होते.
तो- तू मजाक करत आहेस ना?खरं सांग!
ती- अरे मी लग्नानंतर असलं मजाक करेल का?तेही लग्नाच्या १०वर्षानंतर
तो- त्याला माहीत आहे सगळं.
ती- हो त्याला माहीत आहे हे तुझं मूलं आहे म्हणून.
तो- पण तू हे मला का सांगत आहेस
ती- मला माझ्या मनावरचं ओझं कमी करायचं होतं.माझी मुलगी आजही जेव्हा प्रशांतला पप्पा म्हणून हाक मारते तेव्हा तेव्हा तुला अंधारात ठेवल्याच ओझं वाढत जातं.
तो- मला तिला भेटायचं आहे!
ती- नाही! तू तुझ्या संसारात लक्ष दे मी माझ्या संसारात खुश आहे. भूतकाळ मला नव्याने जगायचा नाहीये.मला फक्त भूतकाळ विसरायचा आहे म्हणून तुला सांगितलं. तू ही विसरून जा. सगळं!चल निघते मी.
तो काहीच नाही बोलला. फक्त ती दिसेनाशी होउपर्यंत तिला पाहत होता. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते.तो उठला आणि त्या बाकावर हाथ ठेवून फक्त हसला आणि म्हणाला,'तू ही विसरून जा. माझा तिचा आणि आपला भूतकाळ.!'

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..