अभी ना जावो छोड कर...
आज ११ जुलै, तिचा वाढदिवस. कितीवेळा mobile हातात घेऊन नंबर डायल केला आणि कट केला. Message टाईप केला आणि save करून ठेवला कारण send करायचा नव्हता. शेवटी मोबाईल बाजूला ठेवला आणि उठून कपाट उघडले त्यात तिच्या काही आठवणी कैद करून ठेवल्या होत्या तो Box उघडला. माझा shirt ज्यावर तिच्या लिपस्टिक चा मार्क होता म्हणून अजून ही जपून ठेवला आहे. आता तो शर्ट जीर्ण झाला होता तरीही आयुष्यभर जवळ ठेवेल. बॉक्स मधून तिचे एक कानातले डोकावत होते आणि मला खोटारडा म्हणतं हसत होते. कारण माझं ते खोट फक्त त्याला माहित होतं.तिचे कानातले जेव्हा माझ्या बेडवर हरवले होते, ते मुळात कधी हरवलेच नव्हते. मी ते हातामध्ये लपून ठेवले होते. मला त्या क्षणांना आयुष्यभर लक्षात ठेवायचे होते म्हणून ते कानातल मी ठेवून घेतले. कदाचीय ती ही ते एक कानातले पाहुन त्या क्षणांना पुन्हा पुन्हा जगात असेल माझ्यासारखं. तिचा रुमाल आज ही जपून ठेवला आहे मी. इतक्यावर्षात तोही आता जीर्ण आहे पण तिच्या देहाचा तो गंध नव्हे सुगंध, तिच्या स्पर्शातील ती ऊब आजही तशीच आहे.
'मुसळधार पावसात आज
मुद्दामचं भिजलो,
केस पुसायला का होईना
परतशील या आशेने सुखावलो.'
ही चारोळी तिच्यासाठी लिहली होती. पण आता
पाऊस आला की हल्ली भिजायला जावं वाटत नाही कारण आता भिजलेले केस पुसायला तिचा हात पुढे सरसावत नाही.आज ही गाडी तिच्या घरासमोरून गेली की मान तिकडे वळते, पण नजरेला नजर द्यायला ती नसतेस. आजही कार मध्ये रेडिओ वर 'अभी ना जावो छोड कर की दिल अभी भरा नहीं' लागले की असे वाटत जणू ती बाजूला बसून गाणे ऐकतं आहे. पण तो फक्त एक क्षणभर सुखावणारा भास असतो.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा