ती माझी रात्र...
मला रात्र खूप आवडते. आवडते म्हणण्यापेक्षा मी प्रेमात आहे रात्रीच्या असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. रात्र ही माझ्या खूप जवळची आहे. रात्र माझ्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार आहे. तसं ही आम्हा लेखक मंडळीसाठी रात्र म्हणजे एखादा दिवस असतो. मी माझे जास्तीत जास्त लिखाण हे रात्री केलंय. खरं तर मला रात्री लवकर झोप येत नाही. जो पर्यंत मी त्या रात्रीला माझ्या डोळ्यात साठवत नाही तो पर्यंत रात्र रात्र नाही वाटत.रात्र मला नेहमी माझी वाटते. दिवसा माझ्यासोबत चालणारी माझी सावली कितीही माझी वाटत असली तरी ती तिचे रूप बदलते. कधी माझ्यापेक्षा लहान होईन विनम्र होते. तर कधी माझ्या ऐवढी होऊन बरोबरी दर्शवते. आणि कधी तर माझ्यापेक्षा मोठी होऊन माझ्यावर अधिकार गाजवू पाहते. पण ती साथ क्षणिक असते. रात्रीला सावली सोबत नसली तरी एक आपलेपणाची ऊब असते त्या रात्रीत. मनाला शांत करणारी ऊर्जा असते रात्रीमध्ये. दिवसाच्या मोहात काम करून थकलेला प्रत्येक माणूस रात्र झाली की सुटकेचा निश्वास सोडतो.प्रत्येकाला दिवस आपल्या मुठीत सामावून घ्यायचा असतो कारण तो कधी आपला नसतोच. आपली तर रात्र असते हक्काची.
रात्र खरं तर खूप समजदार असते.त्या रात्रीला किती जणांचे गुपित ठाऊक असतात.पण ती ते गुपित स्वतःजवळ जतन करते. मग एखाद्या नव्या लेखकाचे लिखाण असो.नाहीतर प्रियकर प्रियसीचे प्रेमपत्र असो की रतिक्रिया असो. चंद्र साक्षीला असो वा नसो रात्र नेहमी साक्षीला असते.म्हणून तर माझ्या रात्री नावाच्या प्रियसीसाठी हे दोन शब्द.
- बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा