प्यार करने वाले प्यार करते है शान से....

(खरं आज या विषयावर लिहू कि नको यावर खूप विचार केला.पण ज्याच्या आयुष्यावर हे लिहीत आहे तो म्हणाला.नक्की लोकांसमोर मांड आमचे मत! कदाचित या मुळे माझे आई-वडील तरी समजून घेतील)
          प्रतीकने पळून जाऊन लग्न केलं. तुम्ही म्हणाल यात कसलं धाडस ? त्याने धाडस केलंय ते एका वेश्यावस्तीतील मुलीसोबत लग्न करण्याचे. काय झालं? भुवया उंचावल्या! तुम्ही म्हणाल तो त्या रेड लाईट एरिया मध्ये कशाला गेला. तो मानासशास्त्रामध्ये एम.ए. करत होता.त्यामुळे कदाचित त्याने हे धाडसी नाही नाही ऐतिहासिक पाऊल उचलले. कारण त्याने तिच्या देहावरच्या जखमांपेक्षा मनावरच्या जखमा समजून घेतल्या आणि त्या जखमेचे मलम होण्याचे ठरवले.
          प्रतीक ने १वर्षांपूर्वी ऐश्वर्या सोबत लग्न केलं.अर्थात हे नाव त्याने तिला दिले. तर तो साधारण दीड वर्षांपूर्वी तिला रेड लाईट एरिया मध्ये भेटला. खरं तर भेटला काय फक्त चालता चालता तिला बघितलं पण तिच्या त्या चेहऱ्यावरच्या गडद मेकअप मधली निरागस मुलगी त्याला दिसली. त्यानंतर तो रोज तिला बघण्यासाठी तिथे जाऊ लागला आणि दुरून तिला पाहू लागला. हे आता तिच्या लक्षात आले होते. एक दिवस तीच जवळ आली आणि म्हणाली,"क्या साब रोज रोज गुरता है!मझा करना है तो पुरा करो.!" त्याला तिची भाषा आणि वागणं बघून धक्का बसला पण दुसऱ्याच क्षणी तो तिला सोबत न्यायला तयार झाला. त्याने दलालाला तिची किंमत दिली आणि तिला तिला टॅक्सी मध्ये बसवून घेऊन निघाला. ती - किदर जाना साब.!
तो - तू शांत बसशील का थोड्यावेळ
ती - देक साब मैं खाली फुकट पैसे नाही लेती किसीका
तो (हसून) - तर तुला आवडतं हे सगळं
ती - साब! अब इस चिइझ का वो क्या बोलते हो तुम लोक addiction हो गया है.!
तो - अच्छा तुला इंग्लिश पण येतं!
ती - साब काम कि बात करो नहि तो मै जाती.
तो - माझ्याशी लग्न करशील
ती - पागल हो गया
आणि तो विषय तिथेच थांबला तिच्यासाठी. पण तो रोज तिला घेऊन त्या समुद्रकिनारी यायचा आणि एकाच प्रश्न विचारायचा. आणि तिला स्पर्श कधीच केला नाही.३महिन्यात त्यांच्या वागण्याने तीचे मत परिवर्तन झाले होते. नेहमीप्रमाने तो तिला त्या समुद्रकिनारी घेऊन गेला आणि तो काही बोलणार तेच तिने त्याला विचारले -साब मेरे से लगीन करोगे
तो फक्त तिच्याकडे पाहत होता. त्याने तिला पहिल्यांदा मिठी मारली. समुद्रसुद्धा या आनंदात सहभागी होईन उंच उंच लाटा घेऊन त्यांच्या मिठीत येऊ पाहत होता.
       त्यानंतर त्याने तिच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. आणि पोलीस आणि कोर्ट च्या मदतीने तिला त्या वस्तीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला वाटलं होतं त्यापेक्षा ते आयुष्य खूप वेगळं होत. ती म्हणाली त्या प्रमाणे ती खरंच आहारी गेली होती दारूच्या, शरीर संबंधाच्या त्याने तिला मानसोपचार केंद्रात नेऊन उपचार सुरु केला. ६महिने उपचार केल्यावर ती सामान्य आयुष्य जगू लागली.त्यानंतर त्याने तिच्यासोबत वैवाहिक आयुष्य सुरु केले. त्याने तिला समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. पण समाज आजही तिला आणि त्याच्या नात्याला स्वीकारू शकले नाही.केव्हा स्वीकारेल? याची आज ते दोघे आणि तसे कित्तेक जोडपे वाट पाहत आहे.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..