पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणी टाळता येतात...

इमेज
आज जुनी डायरी सापडली. तसं ती कधी हरवली नव्हती फक्त तिला नजरेआड केलं होतं.अगदी तुझ्यासारखं.पण आज डायरीसुद्धा तशीच समोर आली जशी तू आली होतीस अचानक. नकळतपणे माझा चेहरा काही झालेच नाही असा फुलला. पण दुसऱ्याच क्षणी तुझ्या डोळ्यातील ते अनोळखी भाव कुठेतरी बोचू लागले होते.पण आज ही डायरी खूप प्रसन्न होती.कारण या डायरीने फक्त आपला सहवास, आनंद, सुख, आपलेपण आणि प्रेम इतकंच अनुभवलं होतं. म्हणजे मीच तिला ते आभासी जग सत्य आहे असं भासवल होतं. त्यामुळे तिची ती प्रसन्नता पाहून मला अपराधी असल्यासारखं वाटू लागलं.ती तर आनंदली होती मला पाहून तिला वाटले होते. कदाचित आज २८४ दिवसानंतर मी काहीतरी लिहिलं. आणि डायरीला सांगेल की सगळं कसं ठीक आहे. ही डायरीच तर आमच्या प्रेमाची साक्षीदार आहे.आमचा प्रत्येक क्षण तिने अनुभवला आहे.आमच्यासोबत ती कधी हसली आहे.तर कधी शहारली आहे.म्हणजे, आमचं पहिलंवहिलं चुंबन खूप खास होतं. कारण मी इतका उत्साहीत झालो होतो की मी चक्क डोळे उघडे ठेवण्याचा बलिशपणा केला.आणि दुसऱ्याच क्षणाला श्वास अडकेल या भीतीने तिला दूर लोटून मूर्खपणा.त्यावेळी ही डायरी खूप हसली होती माझ्यावर  अगदी तुझ...

माझा आवडता प्राणी - वाघ

इमेज
           माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघाचे माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. आजही काही शेकड्यांनी वाघ आपल्याकडे शिल्लक आहे.जगातील एकूण वाघातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे.वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे.लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतीक आहे.            वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्ग चक्र बिघडून जाईल वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड आणि जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्...

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?

इमेज
तुम्ही कधी प्रेम केलंय? मी पण काय विचारतोय! केलंच असणार. घाबरून जाऊ नका.! मी काही तपशीलवार विचारणार नाही. विचारण्याचा उद्देश फक्त इतकाच की मी जे सांगणार आहे त्याच्याशी एकरूप व्हायला. ती एक आठवण पुरेशी राहील. जेव्हा आपण नवीन नवीन प्रेमात घडत असतो(मी पडणे म्हणत नाही. कारण प्रेम तुमच्यातील तुम्ही शोधून देतो). तेव्हा खूप गोष्टी या पहिल्यांदा होत असतात.म्हणजे बघा.. बऱ्याच वेळेला आपण शरीराने एका ठिकाणी असतो.पण मन मात्र भटकून येतं. काही वेळेला हवेची एखादी थंड जुळून आली की शहारून येत जणू प्रियकर/प्रियसी चा स्पर्श झाला. आपण नेहमी भविष्याचा विचार करतो. स्वप्न बघतो कारण आपल्याला ते मृगजळ हवं हवंस असतं.त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटत असतात.  "तुला माहीत आहे का?तुझ्या देहाचा मनमोहक गंध माझ्या रोमारोमात भिनला आहे."तिच्या हाताच्या बोटांशी खेळत मी तिला म्हंटलं. ती स्मितहास्य देत म्हणाली,"तू लेखक आहेसं.मला माहीत आहे पण कसं असतं ना.!रायटर साब.या गोष्टी पुस्तकात छान वाटतात." मी तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत तिला म्हंटल,"जसं आपल्याला एकमेक...

पती, पत्नी और वो..

इमेज
         दिनांक २७ सप्टेंबर २०१८ ला व्यभिचार हा गुन्हा ठरविणारा भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.खरं तर कायद्यात बदल होणे किंवा रद्द करणे हे तसं पाहता सामान्य असतं. कारण नवी पिढी नवी विचारसरणी घेऊन येते. काय होता कलम ४९७..            व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा या कायद्यानुसार पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्या व्यक्तिविरुद्ध पती गुन्हा दाखल करू शकत होता.पण जर पतीचे विवाहबाह्य संबंध असेल तर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची समानता पत्नीला नव्हती. अजून यात भर म्हणा किंवा पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन.जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असेल तर पतीच्या गैरहजेरीत त्याचे नातेवाईक फौजदारी कलम १९८(२) अन्वये पत्नीविरुद्ध तक्रार करू शकत होते. म्हणून हे कलमही न्यायालयाने रद्द केले आहे. का? कधी? का बरं ? आला हा कायदा..            विवाह संस्थेचे अस्तित्व आणि पावित्र्य राखण्यासाठी हा कायदा लॉर्ड मेकॉलच्या काळात म्हणज...

गुदमरणारा मोकळा श्वास..

'प्रेम हे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते.' प्रेम आणि त्यांच्याभोवती फिरणारी प्रत्येक संकल्पना या इतक्या व्यापक आणि प्रगल्भ असतात की त्याला भाषा,जात,धर्म,पंथ,लिंग असे बंध...

वो यार हैं जो खुशबू की तरह..

इमेज
वो यार हैं जो खुशबू की तरह, हैं जिसकी जुबा उर्दू की तरह.         'दिल से..' या चित्रपटातील गुलजार यांनीच लिहलेल्या ओळीनेच त्याचे वर्णन करता येईल.असा दिल से सहप्रवासी.सहप्रवासी म्हटले तरीही हा काही आपल्याला कळला आहे असे वाटत नाही.गुलजार हे भारतीय चित्रपट सृष्टीला लाभलेला 'कोहिनूर' हिरा.म्हणजे बघा ना.! चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन, गीतकार आणि पटकथा लेखन.असा शब्दावर अधिराज्य गाजवणारा संवेदनशील मनाचा कवी आज वयाच्या ८४ पर्यंत येऊन पोहोचला.त्यांच्या लिखाणाची शैली आपल्या सारख्या सामान्य माणसाला समजणे सोपी असली तरी जाणून घेणे अवघड आहे.म्हणजे हेच बघा ना.! स्वतःच्या जन्मतारखेचा उल्लेख करताना ते 'प्लूटो' या त्यांच्या २०१४ साली आलेल्या कवितासंग्रहातील 'पहचान' या कवितेतून व्यक्त होतात. - मेरी चेसिस की तारीख अट्ठारह अगस्त उन्निस सौ चौतीस हैं।' मोटरगाड्यांच्या 'चासिस' हा एक महत्त्वाचा भाग आहे.हा चासिस नंबर गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचा आवश्यक घटक आहे.या चासिसवर त्या गाडीची उत्पादनाची तारीख दिलेली असते.चोखंदळ आणि जागरूक ग्राहक ती नीट तपासून गाडी...

तो, ती आणि मैत्री..

'समाजाची होणारी प्रगती आणि समाज मनाची होणारी प्रगती.' या वाक्यात जरी किंचित फरक असला तरी त्या वाक्याचा आशय खूप वेगवेगळा आहे. आज जागतिक मैत्री दिन.! म्हणजे मैत्रीचा दिवस तसा ...

रिमझिम गिरे सावन..

"तू आता अति करतो आहेस." ती जरा आवाज चढवुन बोलली. तस कॉफी-शॉप मधल्या सगळ्या नजरा आमच्याकडे वळल्या. मी जरा विरमल्या सारखं खाली मान करत बोललो,"काय करतेस!सगळे बघत आहेत!" ती,"मी सांगितलं का त्यांना! बघा माझा मित्र कसा निर्लज्ज आहे. एक तास उशिरा येऊन मलाच शिकवतोय." आता माझा पारा चढू लागला होता,"आता! तू अति करतेस! मी तुला रिकामटेकडा वाटतो का?माझे सगळे काम करून मी तुला भेटायला आलो.तर मॅडम ला भांडायचे आहे!" ती,"मी भांडत आहे? ठीक आहे मला बोलायचंच नाही तुझ्यासोबत." मी,"तुझा प्रॉब्लेम काय आहे? विचित्र का वागत आहेस." ती,"मी विचित्र वागत आहे.(आणि अचानक रडायला लागली) मी,"हे बाई! इथे तमाशा नको करू.चल आपण बाहेर जाऊ!" ती,"तुला तमाशा वाटत आहे हा!" आता माझा संयम संपला आणि मी उठलो," तूझा मूड ठीक असला की बोलू आपण. बाय.! नीट जा घरी.आणि हो ही रिंग आणली होती तुझ्यासाठी.जर लग्नाला होकार असेल तर घाल." ती फक्त बघत होती. आणि मी निघालो मागे एकदाही वळून न पाहता. कॅफेच्या बाहेर आलो तर पाऊस सुरू होता. डोक्यात खू...

आणि मी विरघळत गेलो..

"हे, सांग ना.!"(असं पावसाकडे बघत तिने माझ्याखांद्यावर डोकं ठेवलं.) मी,"काय सांगू?" ती,"हेच की तुला पाऊस जास्त आवडतो की मी?" मी,"हे काय नवीन?" ती,"सांग ना.!" मी,"प्रेम करतेस माझ्यावर?" ती,"शंक...

ऐतबार..

उसके पायल की चमचम मुझे परेशान कर रही थी। मैंने बिना कुछ कहे अपनी आँखे खोली और उसकी तरफ देखने लगा। होना तो गुस्सा था, लेकिन पता नहीं क्यू उसको देखकर मैं अपना गुस्सा भूल उसे बड...

बारीश में भीगी भीगी वो..

पहली बारीश.. अहाहा हाह... क्या सुकून होता हैं। तीन चार महिने गर्मी से तपता बदन। उसपर पहली बारीश की बुंदे और थंडी हवा में मिट्टी की खुशबू। FM पर बॅकग्राऊंड में सुनिधी के आवाज में '...

जवाब की तलाश...

पता नहीं क्यु? आज घडी धीमी गती से आगे बढ रही है। नहीं! शायद में समयसे तेज सोच रहा हूँ। हाँ.! ये हो सकता हैं। आखिर क्यु ना हो.! आज उससे मैं छे साल बाद मिलुंगा। इतना वक्त इंतजार किया प...

मनाचा गुंता सुटतो तेव्हा..

काही लोक आपल्या आयुष्यात नकळत सामील होतात.दुधात साखर मिसळावी तसे.काही वेळेला हे नाते दूध फटावे तसे फाटून जाते. अस म्हणतात की प्रत्येक नातं हे आपला शेवट सोबत घेऊन येतो. काह...